राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात आजपासून मोठी वाढ, जाणून घ्या…

मुंबई : २०२४ वर्ष संपून २०२५ म्हणजे नववर्षाला सुरूवात झाली. सर्वांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केलं. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय. आता सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत दरवाढ करण्यात आली आहे.
आज पासून राज्यभरातील सलून व ब्युटी पार्लर सेवेत मोठी दरवाढ महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील देण्यात येणाऱ्या सुविधा नुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही २० ते २५ दरवाढ असेल नाभिक समाज नेते व सलून ब्युटी पार्लर असोसिएशन चे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लरचे दर वाढवण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागात देण्यात येणाऱ्या सुविधांनुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे.
दरम्यान, नाभिक समाज नेते व सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांची दरवाढीबाबत माहिती दिली. सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरामध्ये साधारणपणे २० ते २५ टक्के ही दरवाढ असणार आहे. त्यामुळे आता पार्लर आणि सलोनमध्ये जाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे महिन्याचे बटेज कोलमडणार आहे.