दिल्लीत आज मोठी घडामोड, शरद पवार-एकनाथ शिंदे आज एकत्र येणार!! राज्यातील राजकारणात फासे पलटणार?


नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणात सगळं काही आलबेलं नसल्याच्या चर्चा सुरू असताना दिल्लीत मोठी घडामोड होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे एकाच मंचावर असणार आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार आहे. एकनाथ शिंदे यांचा खास सन्मान होणार आहे. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तसेच ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं पुरस्काराचं स्वरुप आहे. दिल्लीत आज पुरस्काराचं वितरण होणार आहे. या पुरस्कार वितरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आज दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते एका मंचावर येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे आजारपणामुळे राजकारणापासून, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत एकत्र दिसणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!