प्रादेशिक परिवहन विभागाचा मोठा निर्णय!! आता रिक्षाचालकांना गणवेश ओळखपत्र बंधनकारक असणार…

पुणे : पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून महत्वाची माहिती दिली आहे. आता शहरातील रिक्षाचालकांना रस्त्यावर व्यवसाय करत असताना पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाची पँट असा गणवेश परिधान करणे तसेच गळ्यात ओळखपत्र घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याचे पालन न केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षांची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तपासणीसाठी विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.
रिक्षाचालकांचा गणवेश, ओळखपत्र आणि त्यांच्या वैध कागदपत्रांची तपासणी या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. नियमभंग केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी याबाबत पत्र काढले आहे.
रिक्षा सेवा पुरवताना गणवेश आणि ओळखपत्र परिधान केलेले नसल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. हा नियम सर्वांना लागू असणार आहे. प्रवासातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रिक्षाचालकांची ओळख पटावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा पुरवताना गणवेश तसेच ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील रिक्षाचालक सेवा पुरवताना या नियमाचे पालन करताना दिसत नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे आता असे झाल्यास कारवाई केली जाणार आहे.