जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबाबत मोठा निर्णय! आता शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिकवर, शिक्षकांच्या अनुपस्थितीचे प्रमाण कमी होणार..

पुणे : आज जिल्हा परिषदेचे (प्राथमिक) शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सर्व शिक्षक संघटनांची बैठक घेतली. यामध्ये आता जिल्हा परिषद शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवर होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या नव्या प्रणालीमुळे शिक्षकांच्या अनुपस्थितीचे प्रमाण कमी होणार आहे.
शाळांमध्ये बायोमेट्रिक यंत्रे बसवण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा वार्षिक योजना, कंपनीचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) तसेच इतर शासकीय योजनांमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच याबाबत काम सुरु होणार आहे.
या निर्णयामुळे शिक्षकांना शाळेत वेळेवर हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण क्षेत्र अधिक पारदर्शक ठेवण्याच्या दृष्टीने हा एक सकारात्मक निर्णय ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे हा फायदेशीर निर्णय आहे.
शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी शाळेत जाऊन मुलांना अध्यापन करणे महत्त्वाचे आहे. तीन हजार 546 प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक एकप्रमाणे बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच केंद्र प्रमुख किंवा शाळांनी ऐच्छिक गणवेश करण्याचे आवाहन केले आहे. शिक्षकांची शाळेतील उपस्थितीची दैनंदिन माहिती जिल्हा परिषदेला असणे गरजेचे आहे.
दरम्यान, शिक्षकांचीही माहिती मिळण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. सध्या हे प्रस्तावित असून, शिक्षक संघटनांशी बोलणे सुरू आहे.शिक्षकांवर लक्ष ठेवणे हा उद्देश नाही. विद्यार्थी किती उपस्थित आहे, त्याचीही माहिती मिळते. हा निर्णय लवकरच लागू करण्यात येणार आहे.