फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर होणार मोठे बदल, मार्क झुकेरबर्ग यांचा मोठा निर्णय, नेमकं काय होणार बदल, जाणून घ्या….

नवी दिल्ली : फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये मोठा बदल होणार आहे. मेटा कंपनीकडून थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम आता बंद करण्यात येणार आहे. तर त्याजागी आता मेटा कंपनीकडून कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोगाम सुरू होणार आहे. यामुळे सोशल मीडिया बघणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक महत्वाचा बदल आहे.
मेटाकडून सुरू करण्यात येणाऱ्या या नव्या प्रोग्रामद्वारे युजर्स स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकणार आहेत. यामुळे हा पर्याय बघून नेमकं काय फरक पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा नवा प्रोग्राम इलॉन मस्कच्या ट्वीटरप्रमाणे काम करताना दिसणार आहे.
दरम्यान, या बदलाची सुरूवात अमेरिकेतून करण्यात येणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग याने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत घोषणा केली.
यामध्ये त्याने या बदलाची माहिती दिली आहे. आता येणाऱ्या काळात वापरकर्त्यांना काय बदल दिसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी याबाबत चाचपणी करत होती.
मेटा कंपनीकडून कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोगाम सुरू होणार आहे. मेटाकडून सुरू करण्यात येणाऱ्या या नव्या प्रोग्रामद्वारे युजर्स स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकणार आहेत. यामुळे हा बदल वापरकर्त्यांना किती प्रभावी दिसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.