जिओकडून क्रिकेट प्रेमींसाठी मोठी घोषणा! IPL मोफत पाहण्यासाठी लागू केली एक नंबर ऑफर…

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून लोक आयपीएलची वाट पाहात होते. येत्या २२ मार्च रोजी यंदाच्या आयपीएल हंगामाचा पहिला सामना होणार आहे. त्याआधीच यावेळी आपयपीएल नेमका कुठे पाहावा? आयपीएलचे सामने पाहण्यासाठी पैसे भरावे लागणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
आयपीएल २०२५ ची उत्सुकता क्रिकेटप्रेमींसाठी वाढत असताना जिओने एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. JioStar या स्ट्रीमिंग सेवेद्वारे २०२५ आयपीएलचे सामने मोफत पाहता येणार आहेत.
आगामी आयपीएलचा हंगाम लक्षात घेऊन जिओ या टेलकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना तब्बल ९० दिवस जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. जिओ सिमकार्ड असणाऱ्यांनाच ही ऑफर लागू असेल.
ही ऑफर मिळवण्यासाठी जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना कमीत कमी २९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. कमीत कमी २९९ रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यालाच आगामी ९० दिवसांसाठी म्हणजेच तीन महिने जिओस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.
ही ऑफर ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असणार आहे. नव्याने जिओचे सिमकार्ड घेणाऱ्या व्यक्तीलाही ही ऑफर लागू होईल. मात्र त्यासाठी त्या व्यक्तीला कमीत कमी २९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.