लाडक्या बहिणींचे नियम केले कडक!! ‘या’ महिला होणार अपात्र, मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा..

मुंबई : सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हिवाळी अधिवेशन होताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा कऱण्यात येणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
आता या योजनेला घेऊन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकष बाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेले असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच चारचाकी वाहन असलेल्या महिला अपात्र ठरतील, आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत. आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
त्याप्रमाणे लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येत आहे. अशातच आता लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी होणार असल्याने काही महिलांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटनी होणार नाही, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. काही तक्रारी आल्या आहेत त्यांच अर्जांची स्क्रुटनी करण्यात येणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटनी होणार नसून वेगवेगळ्या अँगलने स्क्रूटीनी होणार असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
तसेच काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहे तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ताक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मूळ GR मध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे देखील अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.