बीड पुन्हा हादरलं! २ सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?


बीड : जिल्ह्यातुन पुन्हा एकदा धक्कदायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. यात एकजण गंभीर जखमी झालाय. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

अजय भोसले आणि भरत भोसले असे मयताचे नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी आहे

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन संख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

तिघेही भाव त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले. यातील लोकांनी या तीनही भावांवर शस्त्राने हल्ला चढवला. आणि ही घटना घडली आहे. हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला? हे मात्र अद्याप समजले नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!