काळजी घ्या! वादळाचा तडाखा, महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी…


पुणे : महाराष्ट्रात पावसाने चार ते पाच दिवसांपासून असून अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठेनुकसान झालं आहे. फळबागा भुईसपाट झाल्या आहेत.

ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. दरम्यान आजा पुन्हा एकदा हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हंटले आहे.

दरम्यान दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला आहे, त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी फलक कोसळण्याच्या घटना घडल्या. याचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला. वादळामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!