Baramati News : नवरा-सासूकडून विवाहितेचा शारीरिक छळ, हातपाय ओढणीने बांधून केले धक्कादायक कृत्य, घटनेने बारामती हादरले…


Baramati News : पुणे जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना बारामतीतून समोर आली आहे.

शारिरिक व मानसिक छळ करत विवाहितेचे हातपाय ओढणीने बांधत तिला शेततळ्यात बुडवून तिचा खून केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे घडला आहे.

या प्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या घटनेने बारामतीत एकच खळबळ उडाली आहे. Baramati News

सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकूबाई महादेव गडदरे (रा. मासाळवाडी), नणंद आशा सोनबा कोकरे व नंदावा सोनबा चंदर कोकरे (रा. कुतवळवाडी, ता. बारामती) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नामदेव बबन करगळ (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली.

मिळालेल्या माहिती नुसार, रविवारी (ता. २४) रोजी सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी मासाळवाडीतील भगवान बिरा गडदरे यांच्या शेततळ्यात ही घटना घडली. फिर्यादीची मुलगी सुरेखा हिला या चौघांनी शारिरिक, मानसिक छळ करत त्रास दिला.

पती भाऊसाहेब व सासू ठकूबाई यांनी तिचे दोन्ही हात लाल रंगाच्या ओढणीने बांधून घराजवळील शेततळ्यात तिला पाण्यात बुडवून मारले असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवलकर करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!