Baramati : बारामतीत लाडकी सूनबाई योजना सुरू, मिळणार पोटभर जेवण, जाणून घ्या…

Baramati : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.
तसेच लाडका भाऊराया योजना या सर्व सामान्यांसाठी लागू करण्यात आल्या आहेत. त्यातच आता लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याची मागणी होत असताना बारामती मधून एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लाडकी सुनबाई योजना, “सासूबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री” असे या पोस्टरवर नमूद करण्यात आले आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे. तर हा प्रकार नेमका काय आहे? ते जाणून घेऊयात…
नेमकं झालं काय?
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्य सरकार कडून सर्वसामान्यांसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री भाऊ राव योजना या सध्या सर्व सामान्यांसाठी लागू करण्यात आल्या आहेत.
त्यातच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याची मागणी केली होती. ती गोष्ट चर्चेत असतानाच पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका हॉटेल चालकाने लाडकी सुनबाई योजनेचे पोस्टर बनवले आहे.
या पोस्टवर लाडकी सुनबाई योजना असे बॅनर तयार करण्यात आले असून त्यावर “सासूबाईंच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री” असे नमूद करण्यात आले आहे.
अजून त्यात लिहिण्यात काय आले आहे?
सासूबाईला जेवायला घेऊन येणे आवश्यक
सासूबाईला जी थाळी देणार तीच थाळी सुनबाईला फ्री मिळणार.
घरांमधील कमीत कमी पाच लोकांना जेवायला मिळणार.
दरम्यान, अशा आवश्यक गोष्टी देखील या बॅनरवर नमूद करण्यात आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या बॅनरची चांगले चर्चा असून राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांचा आधार घेऊन या हॉटेल चालकाने भन्नाट युक्ती लढवली आहे. आनंद सावंत असे हॉटेल चालकाचे नाव असून तो बारामतीचा राहणार आहे.