Baramati : बारामतीत स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक, घटनेने उडाली खळबळ, तपास सुरू…

Baramati : बारामतीच्या माळेगावातील कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये मृत अर्भक सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अर्भक नवजात स्त्री जातीचे असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं घडलं काय?
बारामतीच्या माळेगावात एक कृषी विज्ञान केंद्र आहे. या कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये नवजात स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलं. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्याद दिली आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचारी वर्गाच्या लक्षात ही घटना आली. त्यानंतर तात्काळी पोलिसांनी याबाबत कळवण्यात आले. बुधवारी आषाढी एकादशीच्या दिवशी बारामतीत घडलेल्या कृत्यावर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. Baramati
आषाढी एकादशीच्या दिवशी ही घटना उघडकीस आली. कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहात नवजात स्त्रीजातीचं अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अर्भकाचा जन्म झाल्याचे लपवून ठेवून बालकाची देखभाल न करता त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देश मनात ठेवूनच हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे