बँकॉक टूर, 68 लाख खर्चून घेतलं खाजगी विमान, पण तानाजी सावंत यांनी यंत्रणा हलवली अन् मुलगा अंदमानमधूनच दोन तासात माघारी आला, नेमकं घडलं काय?


पुणे : काल पुणे विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली. यामुळे एकच खळबळ उडाली होती. राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्याची माहिती होती. याबाबत तपास सुरू केल्यावर अनेक गोष्टी पुढे आल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नंतर तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा एअरपोर्टवरुन खासगी विमानाने बँकॉकला गेल्याचं पुढे आले. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या सगळ्यांना फोन लावून यंत्रणा सतर्क केली. बँकॉकडे निघालेले विमान अंदमान निकोबारपर्यंत गेले होते. त्यांनी ते माघारी बोलावून घेतलं.

नंतर हे विमान चेन्नईला लँड केलं आणि तिथून पुण्याला बोलावून घेतलं. रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान ऋषिराज सावंत हा पुण्यात दाखल झाला. रोज दहा-पंधरावेळा बोलणं होणारा मुलगा न सांगता कसंकाय गेला, असा प्रश्न तानाजी सावंत यांना सतावत होता. यामुळे सगळेच चिंतेत होते. याबाबत सगळेच सतर्क झाले होते.

त्यामुळेच त्यांनी सूत्र फिरवत मुलाचे विमान चेन्नईत लँड केले. तिथून ते पुण्याला बोलावून घेतले. ६८ लाख रुपये खर्चून तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला निघाला होता, अशी माहिती आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने सावंतांनी मुलाचं खासगी विमान परत बोलावले

पुण्यात मात्र त्यांचे अपहरण झाल्याच्या बातम्या समोर आल्या. ऋषिकेश सावंत यांना कोणीतरी विमानाने घेऊन गेले आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर त्वरित तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास गुन्हे शाखा करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!