Badlapur : बदलापूरच्या घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक, २४ ऑगस्टला दिली ‘महाराष्ट्र बंद’ची हाक….

Badlapur : बदलापूर येथील एका मोठ्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा देश हादरले आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
यानंतर बदलापूरच्या घटनेच्या निषेर्धात २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आली. या संदर्भातील माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीची आज एक बैठक पार पडली. आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र आलो होतो. मात्र, जागावाटपावर चर्चा न करता बदलापूरची घटना आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था यावर चर्चा केली.
बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात एक रोष निर्माण झाला आहे. त्या घटनेनंतर ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांच्या विरोधात आता गुन्हे दाखल केले जात आहेत. Badlapur
आता आम्ही आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे की, बदलापूरच्या घटनेबाबत २४ ऑगस्ट रोजी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, मला या घटनेत राजकारण करायचे नाही. मात्र, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचे काम रोज राज्यात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अपमानित करण्यात येत आहे आणि काळे लावण्यात येत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.