Baba Siddique Murder Case : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी एकाला पंजाबमधून अटक, महत्वाची माहिती आली समोर…

Baba Siddique Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगनं हत्या घडवून आणल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात आता पुन्हा एका आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
सुजित कुमार असे आरोपीचे नाव असून तो पंजाबमधील लुधियाना येथील मूळ रहिवासी आहे. मात्र तो सध्या मुंबईतील घाटकोपर येथे राहत होता.
या बाबतीत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत गँगस्टर लॉरेन्सच्या टोळीतील १५ संशयित आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली आहे. सुजित कुमारने आरोपी नितीनच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. बाबा सिद्दीकी यांची रेकी करणारा आरोपी नितीन होता.
मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई क्राइम ब्रँच टीम आणि लुधियाना काउंटर इंटेलिजन्सच्या इनपुटनंतर, CIA-2 टीमने शुक्रवारी, २५ ऑक्टोबर रोजी आरोपी सुजित कुमारला अटक केली. असे सांगितले जात आहे की, सुजित कुमार मुंडियांच्या राम नगर भागात सासरच्या घरी आले होते. Baba Siddique Murder Case
सुजित हा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटामध्ये सहभागी झाला होता. बाबा सिद्दिकीला हत्येचा सूत्रधार नितीन गौतन सप्रे याने तीन दिवसांपूर्वी केला असता. यावेळी मुंबईमध्ये तीन दिवस राहिलेल्या आरोपींची देखभाल केली. तसेच त्यांना किराणा सामानाचा पुरवठा केला. सुजितला पुढील तपासासाठी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी आरोपी भगवंत सिंगला नवी मुंबई परिसरातून पकडले. पोलिसांनी सांगितले की, भगवंत सिंह उदयपूरहून मुंबईला एका आरोपीसोबत शस्त्रे घेऊन गेला होता. तो सुरुवातीपासून शूटर्स आणि कट रचणाऱ्यांच्या संपर्कात होता. १९ ऑक्टोबर रोजी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती.