मल्हारगडावर प्रेमी युगुलाची आळंदी म्हातोबातील तरुणाला मारहाण, दगडाने ठेचून जिवे मारण्याचा केला प्रयत्न; सासवड पोलिसांकडून दोघांना अटक..


सासवड : किल्ले मल्हारगडावर अश्लील चाळे करणार्‍या प्रेमी युगुलाने आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील माउंटन ट्रेल रेसचा सराव करणाऱ्या तरुणाला दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात प्रेमी युगलाविरोधात फिर्याद देण्यात आली आहे.किल्ले मल्हारगडावर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती आहे.

वेदांत जाधव (रा. बी. टी कवडे रोड, घोरपडी, पुणे), व एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी प्रमोद जगताप (रा. जगताप मळा, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली होती.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी प्रमोद जगताप हे दररोज माउंटन ट्रेल रेसचा सराव करतात. शनिवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहात्या घरातून माउंटन ट्रेल रेसच्या सरावासाठी किल्ले मल्हारगडावर निघाले होते.

यावेळी झेंडेवाडी बाजूकडील बुरुजाच्या तटबंदीच्या आडोशाला एक अनोळखी मुलगा व एक मुलगी अश्लील चाळे करीत असल्याचे दिसून आले. यावेळी जगताप यांनी त्यांना, ही अश्लील चाळे करण्याची जागा नाही असे समजावून सांगत असताना वेदांत जाधव याने जगताप यांना ‘गडकिल्ला तुझ्या बापाचा आहे का?’ असे म्हणून धक्का देऊन पाठीत दगड मारला.

त्याला प्रतिकार करीत असताना त्याने जगताप यांना खाली पाडत त्यांच्यासोबत असलेल्या मुलीने डोक्यात दगड मारायला सुरुवात केली व गंभीर जखमी केले. दरम्यान, जगताप यांनी गडावरून खाली येऊन मित्र कुंडलीक जाधव याला फोन करून बोलावले आणि सासवड पोलिस ठाण्यात प्रेमी युगुलावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती आहे.तसेच जगताप यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!