बीड सरपंच हत्या प्रकरण अंगाशी येताच धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, थेट मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत म्हणाले, आरोपी माझ्या जवळचा असला तरी…

मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. यामुळे राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. या प्रकरणातील सगळे आरोपी आणि मास्टरमाईंड अटकेत नसल्याचे संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक ठिकाणी निषेध मोर्चा निघाला आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, बीड हत्येतील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला फासावर चढवा, असे धनंजय मुंडे म्हणाले.
ज्यांनी कुणी ही हत्या केली त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. ते फासावर गेले पाहिजेत, असे माझे पहिल्या दिवसापासून मत आहे. संतोष देशमुखही शेवटी माझ्याच जिह्याचा सरपंच होता. मलाही त्याच्याबाबतीत तेवढाच आदर आहे, असेही मुंडे म्हणाले.
यात जे कुणी गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्या, ते माझ्या जवळचे असले तरी सोडू नका. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. यामुळे याबाबत चौकशीची मागणी जोर धरत आहे. याबाबत आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे, तर मग अद्यापही आरोपी आणि खंडणीखोरांना अटक नाही.
बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणा हाताशी घेऊन खंडणी वसूल करण्याचं काम झालं आहे. याला कोण जबाबदार आहे? या सर्व प्रकरणामागे कोण आहे? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी ठरवलं पाहिजे.