पवार कुटुंबाची मोठी राजकीय खेळी! एका निर्णयाने प्रफुल्ल पटेल यांचे अधिकार कमी; राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ, नेमकं काय घडलं?


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत संघटनात्मक बदलांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीमुळे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाल्याचे समोर आले आहे.

२९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या या यादीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले आहेत. या बदलांनुसार काही वरिष्ठ नेत्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नव्या यादीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव आणि जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिव तसेच खजिनदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या बदलांनंतर पक्षाच्या आर्थिक व्यवहार, निधी व्यवस्थापन आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर नवीन पदाधिकाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यापूर्वी काही महत्त्वाच्या आर्थिक जबाबदाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयाने पार पाडल्या जात होत्या.

दरम्यान, या नव्या नियुक्त्यांबाबत पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती का, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळात आणखी राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!