जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरण! पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या तब्बल ६०० एसटी रद्द, प्रवाशांचे हाल..

पुणे : जालन्यातील झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तर पुण्यातून जाणाऱ्या ६०० पेक्षा अधिक बंद रद्द करण्यात आल्या आहेत.
पुण्यातून रविवारी (ता.०३) सकाळपासून सोलापूर, जालना, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, अवसाकडे जाणारी एकही बस पुण्यातून सुटलेली नाही. रोज तेरा ते पंधरा हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात.
मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जाळपोळ होऊ नये याची काळजी घेत या बस पुण्यातच थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं बघायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड या भागातील एसटी बस पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर लातूरला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज या भागांमध्ये ६०० एसटी बस सोडण्यात येतात. याचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.