मुरली अण्णांशी वाद आला अंगलट! गजा मारणेला जमिनीवर बसवलं, टोळीची शहरातून काढली धिंड, नेमकं काय घडलं?

पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारहाण केल्या प्रकरणी गुंड गजा मारणे गॅंगला चांगलीच अद्दल पोलिसांनी घडवली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर गजा मारणे व रुपेश मारणे यांना त्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी केले. त्यानंतर आज गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला.
पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई सुरु केली आहे. यावेळी त्याची आई देखील सोबत होती. पोलिसांनी इतर आरोपींची धिंड काढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे प्रशासनावर टीका होत असून गोळीबार, मारामारी असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
नुकतीच गजा मारणे टोळीकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माणसाला मारहाण करण्यात आली होती. यामुळे कुख्यात गजा मारणे टोळीवर ‘मोक्का’ लावला आहे. टोळी प्रमुख गजा मारणे याच्यावर देखील कारवाई करणार आहे. टोळीला नेस्तानाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नका, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
तसेच ते म्हणाले, त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआरकडून तर त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओ कडून मागवली आहे. यामुळे येणाऱ्या काळात गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
यामुळे येणाऱ्या काळात गुन्हेगारी कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मारणे टोळीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे ही कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असे बोलले जात आहे.