बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून अंजली दमानियांचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल, म्हणाल्या, ‘जो माणूस स्वत: महिलांना…


बीड : बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) चौकशी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली होती.

त्यानंतर सरकारने तपास एसआयटीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट करत, आज दुपारी २ वाजता विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली? आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदे च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे. काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला.

जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही.

वैष्णवीच्या केस मधे मी तिच्या आईवडिलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा एक महिन्याने फ़ास्ट ट्रैक वर केस केली. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फ़ास्ट ट्रैक वर केली नाही? सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दाखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घ्यावी. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नाही, असंही पुढे दमानियांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!