Amravati News : विद्यार्थ्यांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, तलाठी भरती प्रक्रिया रद्द करण्याची केली मागणी…


Amravati News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी भरतीच्या निकालावरुन नवा वाद उभा राहिला आहे. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या तलाठी भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ही भरती प्रक्रिया रद्द करुन नव्याने पदभरती करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होताना दिसत आहे. याच मागणीसाठी अमरावतीमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

तलाठी पदभरती पुन्हा घ्यावी तसेच टीसीएस आयबीपीएस या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या बंद कराव्या या मागणीसाठी आज युवक दिनी विद्यार्थीवर्ग रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. Amravati News

अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.अजय यावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी तलाठी पदभरती रद्द करून नव्याने घ्या व पोलीस भरती तात्काळ काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

यावेळी मागण्याचे फलक विद्यार्थ्यांनी आक्रोश केला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवत मोर्चामध्ये सहभाग घेतला.

तलाठी पदभरती पुन्हा घ्यावी तसेच टीसीएस आयबीपीएस या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या बंद कराव्या या मागणीसाठी शुक्रवारी युवक दिनी विद्यार्थीवर्ग रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!