‘आलिया भट्ट माझी दुसरी पत्नी आहे’ रणबीर कपूरचा धक्कादायक खुलासा, पहिल्या बायकोबद्दलही सांगितलं..

मुंबई : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. रणबीर आणि आलिया भट्ट यांचं लग्न २०२२ मध्ये झाले. लग्नानंतर दोघांनीही ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ हा सुपरहिट चित्रपट दिला.
अशातच आता रणबीर कपूरने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये रणबीरने सांगितलं की आलिया भट्ट त्याची दुसरी पत्नी आहे. आलियाच्या आधीही त्याचं एकदा लग्न झालं आहे.
रणबीरने असंही सांगितलं की, तो अद्याप त्याच्या पहिल्या पत्नीला भेटलेला नाही परंतु लवकरच तिला भेटू इच्छितो. त्याने अनेकांना असे म्हणत चकित केलं. रणबीरने पत्नी आलिया भट्टला ‘दुसरी बायको’ म्हणत एक मजेशीर परंतु धक्कादायक किस्सा शेअर केला.
रणबीर कपूर आपल्या बोलण्यामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतो. एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील एक मजेशीर प्रसंग सांगितला. रणबीर म्हणाला, जेव्हा मी करिअरला सुरुवात करत होतो, तेव्हा एक मुलगी पंडितासोबत माझ्या घराबाहेर आली होती. त्यांच्याकडे लग्नासाठी लागणारी सर्व सामग्री होती. माझ्या अनुपस्थितीत तिने घराबाहेरच माझ्यासोबत लग्न केले आहे.
दरम्यान, रणबीर पुढे सांगतो, मी घरी नव्हतो. नंतर घरी आल्यानंतर गार्डने मला सर्व प्रकार सांगितला. गेटवर कुंकू लागलेलं होतं, आणि फुलं विखुरलेली होती. त्यामुळे technically, ती मुलगीच माझी ‘पहिली पत्नी’ झाली. मी अजूनही तिला भेटलो नाही, पण कधी भेटण्याची इच्छा आहे. यामुळेच रणबीरने आलिया भट्टला ‘दुसरी पत्नी’ म्हंटले आहे.