अजित पवार यांच्या मर्जीतल्या दिवसेंची उचल बांगडी! आता जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी…

पुणे : पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर आली असून पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली झाली असून सुहास दिवसे हे आता जमाबंदी आयुक्त असणार आहेत. तर त्यांच्या जागी आता जितेंद्र हूडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सुहास दिवसे यांच्या जागी सातारचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या जितेंद्र हूडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (पुणे) या पदावर पदोन्नती झाली आहे.
साताऱ्याचे कलेक्टर जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. तर संतोष पाटील यांची बदली सातारा जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. डुडी यांना पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.त्यांच्या जागी क्रीडा आयुक्त म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होते.
हे दोन्ही अधिकारी पुण्यात होते आणि बदलीनंतरही पुण्यात राहिले होते. तसेच विशेष म्हणजे हे दोन्ही अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गुडबुकमधील असल्याचे बोलले जात होते.