Ajit Pawar : मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असत? अरे ढाण्या थोडक्यात वाचलास, अजित पवारांनी रोहित पवारांसमोरच केलं मोठं वक्तव्य…

Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये सत्ताधारी महायुतीला मोठं यश मिळालं असून महाविकास आघाडीचे पानिपत झाले. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाला चांगले यश मिळाले.
यानंतर आज पहिल्यांदाच कराड येथील प्रितीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. अजित पवार समोर येताच रोहित पवार यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच रोहित पवार यांनी देखील पोस्ट केला आहे. Ajit Pawar
यावेळी अजित पवार म्हणाले की, अभिनंदन, बच गया, दर्शन घे दर्शन काकाचं. अरे ढाण्या थोडक्यात वाचला. मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं? असा टोला अजित पवार यांनी लगावला, यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता सरकार स्थापन करण्यात कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. आमदारांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. लवकरच नवीन सरकार स्थापन होणार आहे.: