मी सांगतोय तेच खरं! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हक्कावर अजित पवार यांचे मोठे वक्तव्य….

पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) खूप मोठी फूट पाडली. काल अजित पवार गटाची बैठक झाल्याचं पत्रकारानं म्हणताच आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही सांगू तेच खरं, असं म्हणत अजितदादांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. आज पुण्यात भिडेवाडा आणि फुलेवाड्याची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, पक्षाचे दोन गट पडले आहेत. पक्षाचा एक गट म्हणजे अजित पवार गट महायुतीत सामील झाला असून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इतकेच नाही तर त्यांनी पक्षावर दावा देखील दाखल केला आहे. याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येईल.
त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची? असा सवाल अजूनही सर्वांच्या मनात आहे. निवडणूक आयोगाने अजूनही याबाबत कोणताही निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी कोणत्या गटाची हे निश्चित होईल. त्यामुळे सर्वांचे निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.