Ajit Pawar : ठरलं! महायुतीमध्ये अजितदादा विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार, बैठकीत झाला निर्णय..

Ajit Pawar : सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. महायुतीमध्ये यावेळी भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तीन महत्त्वाचे घटक पक्ष असल्यानं कोणाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाची साप्ताहिक बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीला मंत्र्यांसह कोर कमिटीचे सदस्य देखील उपस्थिती होते.
या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत बोलताना महायुतीमधील तीन मुख्य पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, महायुतीमधील तीनही पक्ष विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार आहे, जागा वाटप लवकरच केले जाईल, विधानसभेला तिन्ही पक्ष एकत्रित सामारे जातील. विधानसभेला राष्ट्रवादी पक्ष ८५ जागा घेणारच असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच मित्र पक्षांबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा सूचनाही अजित पवार यांनी आपल्या सर्व आमदार आणि प्रवक्त्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.