अहिल्यानगर हादरलं! शाळेच्या मधल्या सुट्टीत वाद, इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्याला संपवलं, घटनेने खळबळ..


अहिल्यानगर : राज्यातील अहिल्यानगरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने त्याच्यात शाळेतील विद्यार्थ्याचा खून केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नेमकं घडलं काय?

अहिल्यानगरच्या बागडपट्टी परिसरातील नामांकित शाळेत ही घटना घडली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास, दहावीची पुरवणी परीक्षा संपल्यानंतर सुटीच्या वेळी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात क्रिकेट खेळत होते.

दरम्यान, त्याचवेळी आठवीच्या विद्यार्थ्याने क्रिकेटवरून झालेल्या वादातून दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने पोटावर आणि डोक्यावर गंभीर वार केले. शिक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करून जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हल्लेखोर आठवीचा विद्यार्थी असून मृत मुलगा दहावीत शिकत होता. दोघेही सर्जेपुरा परिसरात राहतात आणि एकाच भागातील असल्याचं समजतं. मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीच्या कुटुंबाकडून याआधी धमक्या दिल्या जात होत्या.

‘तुमच्या मुलाला समजवा, नाहीतर जिवंत ठेवणार नाही’ असे इशारे त्या कुटुंबाने वेळोवेळी दिल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 2024 मध्येही तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर बालगुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. ही घटना शालेय परिसरातील सुरक्षेच्या नियमांबाबत अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!