उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या मुरूम चोरीनंतर पूर्व हवेलीत मुरुम चोरीचा सपाटा! ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ ने महसूलच्या कोट्यवधी महसूलला चुना…

जयदिप जाधव
उरुळीकांचन : उरुळीकांचन गाव कारभाऱ्यांनी जल जीवन मिशन योजनेच्या कामाअंतर्गत शासनाच्या ४ कोटी २२ लाख रुपयांच्या मुरुम चोरीच्या प्रकरणात महसूल प्रशासनाला चुना लावण्याचा प्रकार ताजा असताना केंद्र सरकारने प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध व्हावे म्हणून उदांत हेतून देशभरात सुरू केलेल्या या मिशन अंतर्गत उत्खनन होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा मुरुम पूर्व हवेलीत अन्य ग्रामपंचायत पदाधिकारी व कारभाऱ्यांनी रासरोसपणे चोरी करुन विक्री करण्याचा धंदा सुरू केला असून महसूल विभागाचा गलथान कारभार शासनाच्या गौण खनिजाच्या कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी फिरवत आहे.
पूर्व हवेलीत उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मुरुमाच्या चोरीचा प्रकार शासनाच्या गौणखनिज दंडाच्या वसुलीच्या निकषातील त्रुटींमुळे शासनाच्याच जल जीवन प्राधिकरणाला दंड वसुलीस जबाबदार धरण्यात आल्यामुळे या चोरीच्या प्रकाराचे लोन सर्वत्र पोहचू लागले आहेत. पूर्व हवेली दिवसाढवळ्या अन्य काही गावांत योजनेचा भरमसाठ निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी यांनी महसूल विभागाशी संगनमत करुन कोट्यवधी रुपयांच्या मुरुमाच्या चोरीचा सपाटा लावला आहे. या योजनेतून प्रत्येक खोदकामातून कोट्यावधींचा मुरुम निघत असून तस्कर त्यांना ग्रामपंचायत कारभाऱ्यांच्या संगनमतातून परस्पर विल्हेवाट लावीत आहेत.
पूर्व हवेलीत पाच ग्रामपंचायतीच्या ५० कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीत रास रोसपणे महसूल विभागाच्या अर्थिक संबंधातून मुरुमाची विक्री होत आहे. अक्षरशः या खाणीतून सुरूंग लावून मुरुम काढून या कोट्यवधी रुपयांचा मुरुमाची चोरी करण्यात येत आहे. पूर्व हवेलीत उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या मुरुम चोरी प्रकरणात शासकीय नियमांची पळवाट शोधून कारभाऱ्यांनी या खोदकामातील कोट्यवधींच्या मुरुमाला चुना लावला आहे. या चोरी प्रकरणात ‘जिल्हा प्रशासनाने चोर सोडून संन्यासाला फाशी ‘ या तत्वाने चोरणाऱ्यांपेक्षा कामाची जबाबदारी असणाऱ्या जल जीवन विभागावर तब्बल ३६ हजार ५३६ ब्रास मुरुमाची चोरी केल्याचा ४ कोटी २२ कोटी दंड लावला आहे. कायद्याच्या चौकटी त हा दंड न्यायप्रविष्ट बाब म्हणून माफही केला जाणारआहे. मात्र उरुळीकांचन ग्रामपंचायतीत पचलेली चोरी पुन्हा करण्यात अन्य ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पुढे आले असून दिवसाढवळ्या पूर्व हवेलीत कोट्यवधींचा मुरुमाचे गौणखनिजाची चोरी होऊन शासनाच्या महत्त्वाचा उत्पन्नावर डल्ला मारुन विक्री केली जात असल्याचा प्रकार घडत आहेत.
कर्तव्यनिष्ठ जिल्हाधिकारी आणून उपयोग काय?
पुणे जिल्ह्याला नुकतेच कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी अशी ओळख असलेले अधिकारी म्हणून जितेंद्रडुडीयांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी जिल्ह्यात कामकाज सुरूकरताच प्रशासन सर्वसामान्य नागरीकांच्या अधिकारांचे रक्षण करतील म्हणून काम सुरू केले आहे. अगदी महसूलचा ई – सेवा कार्यक्रम ते गतिमान व स्वच्छ प्रशासन असा कारभार सुरू केला आहे. मात्र त्यांच्या अधिकारात असलेल्या जल जीवन मिशन योजनेतून कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्याचा शासन पुरस्कृत चोरी आळा घालणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिंदवणे ग्रामपंचायतीत स्वच्छ कारभार…
पूर्व हवेलीत शिंदवणे ग्रामपंचायतीचे जल जीवन मिशनचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र या ग्रामपंचायतीनी योजनेचा मुरुम साठ्याची साठवण करुन शासनाच्या महसूलासाठी राखीव करुन ठेवला आहे. या ग्रामपंचायतीने शासन नियम पाळून मुरुम साठा करुन उत्पन्नाचे उदिष्ठ ठेवले आहे. मात्र इतर ठिकाणी सर्वत्र मुरुमाला पाय फुटले आहे.