आदर्श ग्रामपंचायत ग्राममर्मी सन्मान 2025 पुरस्कार ग्रामपंचायत टिळेकरवाडीला प्रदान..

पुणे : श्री गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे “राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्राम गौरव फाउंडेशन मीडिया आयोजित आदर्श ग्रामपंचायत ग्राममर्मी सन्मान 2025 हा पुरस्कार ग्रामपंचायत टिळेकरवाडी ग्रामपंचायतीला मिळाला. या ग्रामपंचायचीचे उत्तम कामकाज असल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हा पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भाप्रसे माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी साहेब, दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते.
यावेळी गावचे सरपंच गणेश टिळेकर, माजी सरपंच सुभाष लोणकर, उपसरपंच वैशाली चौरे ,सदस्य गोवर्धन टिळेकर, सुशील राऊत, माजी उपसरपंच सुषमा टिळेकर, सदस्या कल्पना टिळेकर , ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण खराडे, ग्रामस्थ राजेंद्र टिळेकर, कालिदास झगडे हे कार्यक्रमास उपस्थित होते.