दौंड येथील स्वामी चिंचोली बलात्कार प्रकरणातील आरोपी अटकेत, मठात लपून बसल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई…

दौंड : येथील स्वामी चिंचोली बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीना अटक केली आहे. पंढरपूरला देवदर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील काही महिला व अल्पवयीन पिडीत निघाले होते. स्वामी चिंचोली येथे पहाटे चहा पिण्यासाठी थांबले असता दोघांनी कोयत्याचा धाक दाखवत व मिरचीची पुड डोळ्यात टाकत महिलांच्या अंगावरील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले.
या घटनेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गाडीतून फरकटत आडबाजूला नेत तिच्यावर बलात्कार केला गेला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे याबाबत पोलीस तपास करत होते. समीर उर्फ लकी पठाण (माळशिरस ) विकास नामदेव पाचपुते ( रा. भिगवण) दौंड व भिगवण पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.
याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला. जवळपास दहा पथकामार्फत या घटनेचा तपास सुरू होता. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. यामुळे याबाबत वेगवान तपास सुरू होता.
यामुळे दबाव वाढत होता. याबाबत अखेर कारवाई करण्यात आली आहे. येथील आमदार राहुल कुल यांनी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली होती. ज्या स्वामी चिंचोली भागात ही घटना घडली होती, त्या भागात जवळच असलेल्या एका मठात हे आरोपी आश्रयास असल्याचे समजते. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.