Accident News : भयंकर वेगाने येणारी स्कॉर्पिओ थेट डिव्हायडर तोडून झाली पलटी, पाच डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू…


Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाहून परतणाऱ्या पाच डॉक्टरांची स्कॉर्पिओ जीप प्रचंड वेगाने डिव्हायडर वर आदळली आणि डिव्हायडर तोडून ती पलटी झाल्यानंतर पाच डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस अली आहे.

डॉक्टर अनिरुद्ध वर्मा, संतोष कुमार मौर्य, जयवीर सिंह, अरुण कुमार आणि डॉक्टर नरदेव असे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

ही घटना उत्तर प्रदेश मधील कन्नौज जिल्ह्यातील आग्रा लखनऊ द्रुतगती महामार्गावर घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारा घडली. यातील पाचही डॉक्टर सैफई मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. Accident News

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या या डॉक्टरांनी लखनऊ येथे लग्नाला जाण्यासाठी स्कॉर्पिओ जीप घेतली होती. लग्न उरकून परत येत असताना रस्त्याच्या पलीकडे डिव्हायडर तोडून एका ट्रकला जोरदार धडक दिली.

दरम्यान, या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील घेतली. ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोपेची धुंदी असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!