बारामतीचा तरुणच बनला अजितदादांचा स्वीय सहाय्यक, कसा जुळला योगायोग? जाणून घ्या..

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयात मोठा फेरबदल केला आहे. दहा जणांच्या चमूमध्ये बारामतीचे सुपुत्र व खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप उर्फ बापू जगताप यांचाही समावेश झाला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यामध्ये बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील सुपुत्र व राज्याच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप हे आता अजित पवारांचे स्वीय सहाय्यक असणार आहेत. सर्वांना माहीत आहे की, अजित पवार हे कामासाठी तत्पर असतात. कामात दिरंगाई केली तर ते कोणाला बोलायला मागे पुढे बघत नाहीत.
आता मृदू स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व उत्तम प्रशासकीय कौशल्य यामुळे बिपिन जगताप यांनी खादी ग्रामोद्योग मंडळात आपली छाप पाडली होती. यामुळे याबाबत आता निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांना तीन स्वीय सहाय्यक आहेत.
यामध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन भगवान जगताप तसेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई चे तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आणि मुख्य निरीक्षण अधिकारी व शिधावाटपचे नियंत्रक विनायक निकम हे तिघेजण स्वीय सहाय्यक झाले आहेत.
दरम्यान, सहाव्यांदा उपमुख्यमंत्री बनल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकांची मोठी फेररचना केली. आता येणाऱ्या काळात अजित पवार अजून काय बदल करणार का? हे लवकरच समजेल.