पुन्हा मोठी रेल्वे दुर्घटना! दौंड स्थानकावर रेल्वेला लागली भीषण आग, घटनेचा थरारक व्हिडाओ आला समोर…

दौंड : दौड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, रेल्वे बोगीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागली .या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
दौंड स्थानकावर रेल्वेच्या बोगीला लागली भीषण आग… pic.twitter.com/J9kbgz025Q
— Time2time News (@NewsTime2time) July 17, 2023
अचानक आग लागल्याने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत रेल्वेच्या बोगीचे नुकसान झाले. अग्निशमन दल येईपर्यंत पाईपाने पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.