बँकेत नोकरीची मोठी संधी! हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त ‘एवढे’ दिवस, जाणून घ्या..


नवी दिल्ली : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हजारो पदासांठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबद्दल आपण जाणून घेऊयात…

तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर आणि विक्री) पदासाठी एकूण १३ हजार ७३५ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ७ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ही १७ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन फॉर्म भरु शकतात.

रिक्त असलेलं पद..

एकूण पदे: १३७३५ पदे
सर्वसाधारण: ५८७० पदे
EWS: १३६१ पदे
OBC: ३००१ पदे
अनुसूचित जाती (SC): २११८ पदे
अनुसूचित जमाती (ST): १३८५ पदे

काय हवी शैक्षणिक पात्रता?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा..

यासोबतच उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. १ एप्रिल २०२४ पासून वयाची गणना केली जाईल.

अर्ज दाखल करण्यासाठी राहिले फक्त 4 दिवस…

स्टेट बँक ऑफ इंडियाने तरुणांना मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. मोठ्या प्रमाणात जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळं पातच्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात देखील झाली आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी फक्त ४ दिवस उरले आहे. अर्ज करण्याचटी शेवटची तारीख ही ७ जानेवारी २०२५ आहे. त्या तारखेच्या आत अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. त्यामुळं उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते. यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. सध्या बँक ऑफ बडोदामध्ये विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!