एका कुत्र्याने रोखलं विमानाचं लँडिंग, ५७ मिनिटे हवेतच फिरावे लागले, पुण्यात प्रवाशांचा जीव टांगणीला, नेमकं काय घडलं?


पुणे : काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेल्या विमानाला पक्षी धडकला आणि त्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता पुणे विमानतळावर एक भयानक प्रकार घडला आहे.

भुवनेश्वरहून पुण्याला आलेल्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिगचं करता आलं नाही आणि तब्बल ५७ मिनिटं म्हणजे सुमारे तासभर हे विमान हवेतच घिरट्या घालतं होतं. ते विमान लँड करू न शकल्याचं कारणंही तितकंच धक्कादायक आहे, ते म्हणजे धावपटट्टीवर आलेला एक कुत्रा…

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर येथून पुण्याला येणारे एअर इंडियाचे विमान ( आय एक्स 1097) हे पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रक्रियेत होते, मात्र त्याला लँडिंगच करता आलं नाही. कारण हे विमान सुमारे १०० ते १५० फूट उंचीवर असताना वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा आढळून आला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वैमानिकाने त्या धावपट्टीवर लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा विमान हवेत झेपावलं.

कारण हे विमान आणखी काही फूट खाली आले असते तर मात्र वैमानिकाला पुन्हा विमानाला वर नेणं खूप अवघड झालं असते. त्यामुळे एअर इंडियाचं हे विमान तब्बल ५७ मिनिटं हवेतच घिरट्या घालतं होतं. वैमानिकाने सुमारे दीडशे फूट उंचीवर असताना लँडिंग थांबवलं होतं.

धावपट्टीवर कुत्रा असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी धावपट्टीवर धाव घेतली आणि त्या कुत्र्यालाा तेथून लगेच हिसकावून लावले. अखेर कुत्रा तेथून गेल्यानंतर धावपट्टी लँडिंगसाठी क्लिअर झाली आणि मग त्यानंतरच वैमानिकाने सुरक्षितरित्या विमानाचे लँडिंग केलं. मात्र यामुळे विमानाला सुमारे एक तास उशीर झाला. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून खाली सुखरुप उतरेपर्यंत सर्व प्रवाशांचा जीव तर टांगणीलाच लागलेला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!