सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून तपास सुरु आहे,असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तसेच विरोधकांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. पोलिसांनी या घटनेबाबतची सर्व माहिती दिली आहे. या पाठीमागे कशाप्रकारचा मोटीव असू शकतो, हे देखील त्यांनी आपल्याला सांगितले आहे. आरोपी कुठून आला हे देखील पोलिसांनी सांगितले आहे. आता पूर्ण कारवाई सुरु आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मला असं वाटतं की देशातील मेगासिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की, कधीकधी काही घटना घडतात. त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण मुंबई अधिक सुरक्षित राहायला पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.