प्रिटींग प्रेसच्या ५० वर्षीय मालकाकडून १६ वर्षांच्या मुलीसोबत विकृत कृत्य, आधी ऑफिस मग टेरेसवर….: घटनेने संताप व्यक्त

मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबईतील वसई परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका ५० वर्षीय नराधमाने १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी असे सलग दोन दिवस पीडित मुलीचं लैंगिक शोषण केल्याची माहिती आहे.
याप्रकरणी वळीव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यानुसार पोलिसांनी ५० वर्षीय नराधमाला अटक केली आहे. प्रदीप प्रजापती असं नराधम आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी हा वळीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसई पूर्व परिसरात एक प्रिंटींग प्रेस चालवते. इथे पीडित मुलगी आणि तिचे वडील काम करतात. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना कंपनीच्या बाहेर पाठवून मुलीला थांबवून घेतले होते.
तुझ्याबद्दल तक्रार आल्याचं सांगून तिला कार्यालयात बोलावून घेतलं होते. यावेळी आपल्या कुणीच पाहत नसल्याचं पाहून आरोपीनं पीडित मुलीवर बळजबरी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता कुठेच करू नको, अशी धमकी दिली.
दरम्यान, याप्रकरणाबद्दल पीडितेनं कुणालाच सांगितले नाही. याचा गैरफायदा घेत आरोपीनं दुसऱ्या दिवशी पीडितेला पुन्हा बोलावलं, तिला टेरेसवर घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या प्रकारनंतर घाबरलेल्या तरुणीनं या घटनेची माहिती आपल्या वडिलांना दिली. आपल्या मुलीबरोबर मालकाने अत्याचार केल्याचं समजताच पीडितेच्या वडिलांनी वळीव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.