९ पथके १५० पोलीस, सीआयडीकडून तीन फरार आरोपींचा शोध सुरू, देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी नेमकं गेले कुठं?


बीड : काही दिवसांपूर्वी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करत आरोपींनी हत्या केली होती. या प्रकरणात केज सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा घटनेच्या तीन आठवड्यांनंतरही पोलिसांना व नंतर सीआयडी पथकाला शोध लागलेला नाही.

यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. याच प्रकरणात पोलीस निरीक्षक महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून केज पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

सीआयडीचे पथक फरार सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे या तिघांचा शोध घेत आहेत.
९ डिसेंबर पासून तीनही आरोपी पसार असून ते नेमके राज्यात की राज्याबाहेर गेले, या अनुषंगानेही तपास केला जात आहे. पोलीस यंत्रणेवर संशय व्यक्त केला जात आहे.

आरोपींसाठी सीआयडीकडून वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीची एकूण ९ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये जवळपास १५० जणांचा समावेश आहे. यामुळे आता तपासला गती मिळाली आहे. गावकरी देखील याबाबत आक्रमक झाले आहेत.

आरोपी घुले, आंधळे व सांगळे अजूनही फरारच आहेत. ते नेमके कुठे आहेत, या अनुषंगाने सीआयडीचे अधिकारी कसून तपास करत आहेत. फरार आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी बीड शहर ठाण्यात बोलावले होते. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!