ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 दहशतवादी ठार, पंतप्रधान मोदी जागतिक नेते, मुख्यमंत्र्यांकडून मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकत्याच एका मुलाखतीत देशाची सुरक्षा, अल्पसंख्याक कल्याण आणि निवडणूक सुधारणा याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ऑपरेशन सिंदूर’ हे मोदी सरकारचे मोठे धोरणात्मक यश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्षम नेतृत्वाचे कौतुकही केले आहे.
तसेच वक्फ कायदा आणि ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर देखील नायडूंनी आपली मतं मांडली. नायडू म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे मोदी सरकारच्या धाडसी धोरणांचे यश आहे.
अशा अचूकतेने व मर्यादित हल्ला करण्याची क्षमता इतर कोणत्याही नेतृत्वाकडे नव्हती. या कारवाईत दहशतवाद्यांनी महिलांसमोर त्यांच्या पतींना ठार मारल्याचा दुर्दैवी प्रसंग घडला, पण भारताने निर्णायक आणि नियंत्रित बदला घेतला, असे नायडू म्हणाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री नायडू यांच्या मते, ‘७ मे रोजी सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान भारताने केवळ २० मिनिटांत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी छावण्या नष्ट केल्या. या मोहिमेत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. नागरिक आणि संरक्षण संस्थांना इजा न करता भारताने मानवतावादी दृष्टिकोन राखला. हा संघर्ष लांबला असता तर भारताचे मोठे नुकसान झाले असते,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नायडू पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेवर प्रभावी नियंत्रण ठेवले आणि संभाव्य युद्धाची परिस्थिती टाळली. मोदी आता जागतिक स्तरावर एक मजबूत आणि प्रभावशाली नेते म्हणून उदयास येत आहेत, जी भारतासाठी अभिमानाची बाब आहे.