महादेव कांचन औषध निर्माणशास्त्र महाविद्यालायचा डी फार्मचा १०० टक्के निकाल!

उरुळी कांचन : महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने डी. फार्मसी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. यामध्ये अजिंक्य चारिटेबल फाउंडेशन संचलित, महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, महाविद्यालयातील द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसी चा निकाल नेहमीप्रमाणे अत्यंत गौरवास्पद लागला आहे. यामध्ये द्वितीय वर्ष पदविकाचा निकाल हा १००% लागला आहे.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी सर्वोच्च श्रेणीत यश मिळवले आहे, ही कामगिरी आमच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. यामध्ये डी. फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. अर्चना कदम हिने ८५.३६% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, कु. तृप्ती काळभोर ८०.६४% आणि कुमारी शिवानी वाघमारे ८०.१८% मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच प्रथम वर्ष पदविकाचा निकाल हा ९०.६७% इतका लागला असून कु. पुनम कोळपे ८२.४०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला, तर द्वितीय कु. पठाण कशिष हिने ७६.१०% घेत पटकावला आणि कु. थोरात बाळूबाई ७०.३०% घेत तृतीय क्रमांक मिळविला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन गवई यांनी दिली.
महाविद्यालयात असलेले उच्च शिक्षित अनुभवी शिक्षक वर्ग व त्यांच्या मार्गदर्शनामधून विद्यार्थाना अतिशय दर्जेदार शिक्षण असे शिक्षण प्राप्त हॉट असल्याचे या निकलावरून स्पष्ट दिसत आहे.
विद्यार्थाच्या या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. महादेव कांचन साहेब, संस्थेचे सचिव मा. डॉ. अजिंक्य दादा कांचन, कार्यकारी संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.