आईच्या शेजारी झोपलेल्या चिमुकल्याला रातोरात उचललं; जंगलात नेऊन क्रूर अत्याचार, धक्कादायक तपासात मोठा ट्विस्ट


उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील दिदाउली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नार्थो गावात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दलित समाजातील कमलजीत हा चिमुकला शुक्रवारी पहाटे आईच्या शेजारी झोपलेला असताना रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला. सकाळी आई जागी झाल्यानंतर मुलगा घरात नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी गावभर शोध सुरू केला.

काही वेळानंतर गावाजवळील निर्जन जंगलात मुलगा गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याच्यावर धारदार शस्त्राने अत्यंत अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती आहे.

तपासादरम्यान शान नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला. तो शेजारच्या संभल जिल्ह्यातील रहिवासी असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२६ मध्ये मुलाच्या आईने याच व्यक्तीविरोधात बलात्कार, मारहाण आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीला जामीन मिळाला होता. या पार्श्वभूमीवर दोघांमधील संबंधांचीही चौकशी सुरू आहे.

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत आरोपीच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मुलाच्या आईच्या भूमिकेबाबत कोणताही निष्कर्ष काढलेला नसून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!