रात्री १ वाजता पत्नी गायब, शेजाऱ्याच्या खोलीत पोहोचताच गुपित उघड! संतापलेल्या पतीने दुसऱ्याच दिवशी केलं भयंकर कृत्य!


हरदोई : विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून एका कुटुंबात भीषण घटना घडल्याचं समोर आलं आहे. पत्नी रात्री खोलीत दिसत नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पतीला शेजारच्या खोलीत धक्कादायक दृश्य दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि दुसऱ्याच दिवशी या वादाने हिंसक वळण घेतलं. पतीने विष प्राशन केलं, तर पत्नीवर गळा दाबून आणि चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एक तरुण रोजगारासाठी पत्नी आणि दोन लहान मुलींसह लुधियाना येथे राहायला गेला होता. भाड्याच्या घरात त्यांचा संसार सुरू होता. साधारण पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या गावातील घनश्याम नावाचा तरुणही त्यांच्यासोबत राहण्यासाठी आला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं; मात्र काही दिवसांनी पत्नी आणि घनश्याम यांच्या संबंधांबाबत पतीच्या मनात संशय निर्माण झाला.

पत्नीच्या वागण्यावरून त्याने आक्षेप घेतला होता. संबंधित तरुणाने पतीला आव्हान दिल्याची माहितीही समोर येत आहे. या घडामोडींमुळे पतीच्या मनातील संशय आणि नाराजी वाढत गेली.

रात्री एक वाजता उघड झालं धक्कादायक दृश्य

मंगळवारी रात्री पती घराबाहेर गेला होता. मध्यरात्री साधारण एक वाजता तो परतल्यानंतर त्याला पत्नी स्वतःच्या खोलीत दिसली नाही. त्यामुळे तो तिचा शोध घेत शेजारच्या खोलीत पोहोचला. तिथे पत्नी घनश्यामसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं त्याला दिसल्याचा दावा आहे. यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

दुसऱ्याच दिवशी रक्तरंजित घटना

या वादानंतर दुसऱ्या दिवशी पतीने टोकाचं पाऊल उचललं. त्याने विष प्राशन केलं आणि पत्नीचा गळा दाबण्यासह तिच्यावर चाकूने अनेक वार केले. या झटापटीत पतीदेखील चाकू लागल्याने जखमी झाला. घटनेनंतर दोघांनाही तातडीने लुधियातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढील उपचारांसाठी त्यांना हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून घटनेमागील परिस्थिती आणि नेमक्या घडामोडींचा शोध घेतला जात आहे. दोन लहान मुली असलेल्या या कुटुंबातील घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!