कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा धक्का! बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेनं खोटी तक्रार, कुस्तीपटूच्या वडिलांची माध्यमांसमोर कबुली


नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि कुस्तीपटूंमधील चर्चेत कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले. कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (ता.८) या प्रकरणात आता एक नवीन खळबळजन माहिती समोर आली आहे.

ज्या अल्पवयीन कुस्तीपटूनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, तिच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली होती.

खेळाडू २५ वर्षाचा खेळवला १९ वर्षात, चौघांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितले की, सूडाच्या भावनेने त्यांनी WFI प्रमुख बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली, पण त्यांना आता स्वतःची चूक सुधारायची आहे. आता सत्य बाहेर यावं अशी त्यांची इच्छा असल्याचंही मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे.

सरकारने गेल्या वर्षी झालेल्या चाचणीत त्यांच्या मुलीच्या पराभवाची निष्पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन दिले आहे, म्हणूनच त्यांनी सत्य बोलण्याचा निर्णय घेतला आहे. बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या मुलीच्या नसून त्यांचा होता, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ते म्हणाले की, हा माझा निर्णय होता. मी बाप आहे आणि तिच्यावर रागावलो होतो. मी घडत असलेल्या घडामोडी तिला सांगितल्या, पण त्यानंतर माझ्या मुलीनं बाबा, तुम्हीच पाहा, असं मला सांगितले.

राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, तुझाही दाभोळकर..

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनीही त्यांच्या आणि त्यांच्या मुलीने बृजभूषण सिंह यांच्या विरोधात केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. याची सुरुवात २०२२ मध्ये लखनौ येथे झालेल्या आशियाई अंडर-17 चॅम्पियनशिपच्या चाचणीनं झाली, ज्यामध्ये अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी भारतीय संघात प्रवेश करू शकली नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी रेफ्रींच्या निर्णयासाठी त्यांनी बृजभूषण यांना जबाबदार धरले होते.

ते म्हणाले की, मी सूडाच्या भावनेने भरून गेलो होतो, कारण माझ्या मुलीची एक वर्षाची मेहनत पंचाच्या चुकीच्या निर्णयाने व्यर्थ गेली. त्यामुळेच मी बदला घेण्याचे ठरवले.

निलेश राणेच्या कानाखाली जो वाजवेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस! राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा..

दरम्यान, बृजभूषण सिंह यांनीही अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “त्यांच्या मनात कोणासाठीही वाईट भावना नाहीत. माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अल्वयीन मुलीची दिशाभूल केली, त्यामुळे तिच्या हातून एवढी मोठी चूक घडली.

माझ्या मनात तक्रारदार कुस्तीपटू किंवा तिच्या कुटुंबाबद्दल कोणतीही वाईट भावना नाही. त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्याची माझी मागणी नाही. पण यातून मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचं सिद्ध झाले आहे.

बुधवारीच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासोबत बैठक घेतली होती. यानंतर पैलवानांनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित केलं होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!