मोठी बातमी! मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक, भयंकर माहिती आली समोर…

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांचा मागणी केली होती. यामध्ये १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेनं मीडियासमोर येऊन जयकुमार गोरेवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आता मोठा ट्वीस्ट आला आहे. ज्या महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
सातारा पोलिसांनी आज सकाळी आठ वाजता मोठी कारवाई करत महिलेला अटक केली आहे. संबंधित महिलेनं हे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे तीन कोटींची मागणी केली होती. यातील एक कोटींची रक्कम स्विकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संबंधित महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. हा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात देखील गाजला. आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला असून आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. सातारा गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. एक कोटींची रक्कम स्विकारताना ही अटक केल्याचं सांगितलं जातंय. सातारा शहर पोलीस ठाण्यात अटकेची पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, २०१९ मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. जे रेकॉर्ड होतं ते देखील हटवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र,जयकुमार गोरे यांना विवस्त्र फोटो पाठवल्याप्रकरणी त्यावेळी न्यायालयात महिलेची माफी मागितली होती, असा आरोप आता केला जात आहे. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.