शरद पवारांची तब्येत ठणठणीत! अफवांना पूर्णविराम; रोहित आणि जय पवारांनी दिली स्पष्ट माहिती..


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पवार कुटुंबीयांनी स्पष्ट केले असून त्यांची तब्येत उत्तम असल्याची माहिती दिली आहे.

त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ते मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी किंवा नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. त्यांनी सांगितले की, अनेक जणांनी काळजीपोटी संपर्क साधला होता. मात्र, पवार साहेबांची तब्येत चांगली असून त्यांच्याशी स्वतः फोनवरून संवादही झाल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच युवा नेते जय पवार यांनीही बारामतीत माध्यमांशी बोलताना अफवांचे खंडन केले. त्यांनी सांगितले की, कुटुंबीयांशी झालेल्या चर्चेनुसार पवार साहेबांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पसरत असलेल्या अपुष्ट आणि चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पवार कुटुंबीयांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!