मुख्यमंत्री फडणवीस मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार? संभाव्य यादीत शिंदे सेनेचे सर्वाधिक…


पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन होऊन सहा महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. मात्र या कालावधीत अनेक मंत्री घोटाळ्याचे आरोप झालेले, वादग्रस्त विधानामुळे चांगलेच अडचणीत आले. आता या मंत्रिमंडळातील अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे.यात शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची संख्या सर्वाधिक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या आधी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट , संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकतात अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.
या चौघांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे , नरहरी झिरवळ यांचंही मंत्रिपद जाऊ शकतं. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक, मुख्यमंत्र्‍यांचे अतिशय जवळचे मंत्री गिरीश महाजन यांनाही पायउतार व्हावं लागू शकतं. जलसंपदा मंत्री असलेल्या महाजन यांच्याकडे संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शक्ती अशी माहिती समोर आली आहे.

विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे ते वादात सापडले. यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट बेडरुममध्ये सिगारेट ओढत असल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यांच्याजवळ पैशांनी भरलेली बॅग दिसली. त्यामुळे शिरसाट वादग्रस्त ठरले. तसेच गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्यावर मातोश्रींच्या मालकीच्या बारवर धाड पडली. हे सगळे नेते शिवसेनेचे आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे सातत्यानं वादग्रस्त विधानं करत आहेत. विधान परिषदेचं कामकाज करताना ते रम्मी खेळत असतानाचा व्हिडीओ समोर आला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या व्यक्तीला कोणत्याही पासशिवाय थेट विधिमंडळात घेऊन गेले. त्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निकटवर्तीय असलेल्या नितीश देशमुख यांना मारहाण केली. या सगळ्या मंत्री, आमदारांमुळे महायुती सरकारची बदनामी झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका पक्षाला बसू शकतो या अनुषंगाने मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!