हवेली तालुका खरेदी-विक्री संघात प्रदीप कंद, सुरेश घुले, प्रकाश म्हस्के आणि प्रशांत काळभोर यांच्या सहकारमहर्षी आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलला १९ पैकी १६ जागा; विकास दांगट, प्रकाश जगताप यांचा वारू रोखला; केवळ ३ जागांवर समाधान


उरुळीकांचन : हवेली तालुका खरेदी विक्री संघाच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमहर्षी आण्णासाहेब मगर पॅनेलने १९ पैकी १६ जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. पॅनेल प्रमुख जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, तज्ञ संचालक सुरेश घुले, माजी संचालक प्रकाश म्हस्के, पुणे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या रणणितीला यश मिळून प्रतिस्पर्धी आव्हान उभे केलेल्या जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट व पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांच्या आण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनेलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

या विजयाने पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांचे तालुक्यात सहकार क्षेत्रातील विजयी मालिकेला ब्रेक लावण्यात तालुक्यातील नेतेमंडळींना सामुहिक यश आले आहे.

हवेली तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुण्यातील गुलटेकडी मार्केयार्ड येथे शनिवार (दि.२१) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतरच्या झालेल्या मतमोजणीत जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, तज्ञ संचालक सुरेश घुले ,माजी संचालक प्रकाश म्हस्के, पुणे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने १९ पैकी जागांवर यश मिळविले आहे.

तर प्रतिस्पर्धीजिल्हा बँकचे संचालक विकास दांगट व पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप १६ यांच्या आण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनेलला १९पैकी जागांवर समाधान मानावे लागले आहेत. या संघाची स्थापनेनंतर प्रथमच ३८ वर्षानंतर निवडणूक होऊन तालुक्यात हा सामना पहायला मिळाला आहे.

मतमोजणीनंतर सहकार महर्षी आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे संस्था प्रतिनिधी गटातून १० पैकी ७ उमेदवार तर वैयक्तिक सभासद गटातून ४ पैकी ४ उमेदवार तर महिला वर्गात २ पैकी २ तर ओबीसी राखीव , अणुसुचित जाती /जमाती व भटक्या जाती प्रवर्गातून विजयी झाले आहे.

दरम्यान सहकार संस्था प्रतिनिधी गटात सहकारमहर्षी आण्णासाहेब मगर पॅनेलच्या अश्विनी भोरडे या ईश्वरचिठ्ठीत पराभूत झाल्या असून परिवर्तन पॅनेलचे तुषार कुटे हे विजयी झाले आहेत.

(अधिकृत आकडेवारी काही वेळात)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!