हवेली खरेदी-विक्री संघात संस्था प्रतिनिधी गटात सहकारमहर्षी आण्णासाहेब मगर विकास पॅनेलचे १० पैकी ८ उमेदवार विजयी; दांगट व जगताप गटाला केवळ २ जागांवर समाधान…

उरुळी कांचन : हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या अत्यंत चुरशीच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकारमहर्षी आण्णासाहेब मगर विकास पॅनेलने बाजी मारली आहे. संस्था प्रतिनिधी गटातील १० जागांपैकी ८ जागांवर या पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर विरोधी आण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनेलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले.
हवेली खरेदी-विक्री संघाच्या संस्था प्रतिनिधी गटाची मतमोजणी पूर्ण झाली असून, विकास पॅनेलचे प्रदीप खंडू आहिरे आणि तेजस कोकाटे यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी पॅनेलचे हवेली पंचायत समितीचे विद्यमान सदस्य कृषीराज ऊर्फ मनोज चौधरी आणि खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र खांदवे यांनी विजय मिळवला.
Views:
[jp_post_view]
