काय सांगता! टोमॅटो ठरले पती पत्नीच्या भांडणाचे कारण! टोमॅटो जास्त का वापरला म्हणून बायको गेली ….

नवी दिल्ली : टोमॅटोचे दर सध्या खूपच वाढले आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतींमुळे एक बायको नव-याला सोडून घरातून निघून गेली. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यात घडली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

संजीव बर्मन याचा टिफिन सर्व्हीसचा व्यवसाय आहे. त्याने घरी जेवण बनवत असताना २ टोमॅटो वापरले होते. यावरून त्याचे आणि त्याच्या बायकोचे जोरदार भांडण झाले होते.
भांडण सुरू असताना संजीवची बायको उठली आणि तिने त्यांच्या मुलीसह घरातून बाहेर पाऊल ठेवले आणि ती परत आलीच नाही. यामुळे आता टोमॅटोमुळे काय काय होऊ शकत याचा अंदाज आला असेल.

दरम्यान, न विचारता जेवणात २ टोमॅटो वापरल्याने संजीवची बायको त्याच्यावर भडकली होती. संजीवने या दोघींना शोधायचा बराच प्रयत्न केला मात्र दोघी कुठेही सापडल्या नाहीत. यामुळे त्याने पोलिसांत धाव घेतली आणि बायकोने मुलीसह घर सोडले असून दोघी सापडत नसल्याची तक्रार दिली.
